डिझेल विडर की पेट्रोल विडर? कोणता घ्यावा?

  • July 19, 2022

त्यासाठी सर्वप्रथम आपण पेट्रोल आणि डिझेल मधला फरक समजून घेतला पाहिजे. 

पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही पृथ्वीच्या आत खोलवर दाबलेल्या कच्च्या तेलापासून तयार होते. ह्या कच्च्या तेलाला एका मोठ्या फर्नेस (भट्टी सारखे) मध्ये उष्णता दिली जाते. फर्नेस च्या विविध भागांना कमी जास्त प्रमाणात उष्णता दिली जाते. फर्नेस च्या वरच्या भागात सर्वात कमी उष्णता असते आणि खाली सर्वात जास्त. साधारण कमी उष्णता असलेल्या भागातून जे तयार होते ते पेट्रोल, माध्यम उष्णतेच्या भागात डिझेल तसेच जास्त उष्णतेच्या भागात ग्रीस सारखे पदार्थ तयार होतात.पेट्रोल तयार व्हायला कमी उष्णता लागत असल्यामुळे ते सर्वात वरती तयार होते, याचाच अर्थ पेट्रोल हे डिझेल पेक्षा हलके असते. त्यामुळे पेट्रोल ने होणारे इंजिन चे ॲक्सलरेशन हे डिझेल पेक्षा जास्त असते पण डिझेल जड असल्यामुळे त्यात पेट्रोल पेक्षा जास्त ऊर्जा असते. त्यामुळे जर आपली जमीन घट्ट असेल किंवा चिखल गुढघ्याच्या आणि तळ पायाच्या मध्ये असेल तर तुम्ही डिझेल विडर घेतला पाहिजे. कारण डिझेल तुम्हाला अधिक ऊर्जा देईल. तेच जर चिखल कमी असेल आणि माती कठीण नसेल तर पेट्रोल विडर देखील उत्तम काम करू शकतो. 

डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा अधिक कार्यक्षम असते. परंतु, इतका मोठा टॉर्क निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, इंजिनमध्ये मोठी ताकद असणे आवश्यक असते. त्यामुळे डिझेल इंजिन तुलनेने मजबूत आणि जड असतात. ह्या कारणामुळे त्यांचा मेंटेनन्स देखील तुलनेने जास्त असतो. 

डिझेल ची कार्यक्षमता पेट्रोल पेक्षा जास्त असल्यामुळे डिझेल विडर्स ची किंमत ही पेट्रोल विडर्स पेक्षा जास्त असते. 

त्यामुळे आपल्या जमिनीप्रमाणे, कामाचे स्वरूप, मेंटेनन्स, तसेच बजेट ह्या सर्व बाबींच्या आधारे पेट्रोल की डिझेल विडर हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. Viji ॲप तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे योग्य कृषी अवजारे निवडायला मदत करेल.