शेती अवजारे खरेदी करताना कोणाकडून खरेदी करत आहोत या बद्दल आपण जागृक आहोत का?

  • July 19, 2022
कोणतीही वस्तू खरेदी करताना आपल्या डोक्यात पहिला विचार हाच असतो कि जिथे कुठे मला ती वस्तू कमीत कमी किमतीत मिळेल तिथून मी खरेदी करेन. आणि ह्या विचारात काहीच चुकीचे नाही. 

पण त्या सोबत ज्या विक्रेत्या कडून मला ती वस्तू घ्यायची आहे तो विक्रेता 
१. मशीन कशी वापरायची याची योग्य माहिती देईल का?
२. मला विक्रीपश्चात सर्व्हिस देईल का?
३. स्पेअर पार्ट उपलब्ध करून देईल का?

जर तो विक्रेता कमी किमती सोबत वरील ३ गोष्टी देत नसेल तर कसे तुमचे नुकसान होऊ शकते हे पाहूया

समजा तुम्ही भात शेती करता आणि तुम्हाला नवीन पॉवर विडर घ्यायचा आहे. तुम्ही बाजारात गेलात, विविध विक्रेत्यांकडून किमती काढल्या आणि कमी किमतीत वस्तू मिळणाऱ्या कडे घ्यायचे ठरवलेत. नंबर १. पॉवर विडर विकत घेताना तुम्हाला हे सांगितले गेले नाही, की ह्या सिझन मध्ये विडर वापरून झाल्यावर त्यामधले पेट्रोल काढून ठेवले पाहिजे, आणि ऑइल बदलून ठेवले पाहिजे. आणि तुम्ही ते तसेच ठेवलेत. आता पुढच्या वर्षी तुम्ही विडर वापरायला घेतला आणि जाणवले की मशीन चालूच होत नाही आहे. तुम्ही विक्रेत्याला फोन केलात आणि सर्व्हिसिंग साठी बोलावले. नंबर २. विक्रेत्याकडे सर्व्हिसिंग साठी टेक्निशियन नाही. आता तुम्हाला स्वतःलाच टेक्निशियन शोधावा लागतोय ज्या मध्ये तुमचा वेळ निघून जात आहे. कसे बसे करून एका आठवड्यात टेक्निशियन आला. त्याने चेक केले काय झाले आहे आणि सांगितले की "पेट्रोल व ऑइल मुळे कार्बोरेटर खराब झाला आहे आणि पेट्रोल टाकी बदलावी लागणार आहे." मग तुम्ही विक्रेत्याला पुन्हा फोन केलात. नंबर ३. विक्रेत्याने सांगितले की पेट्रोल टाकी आणि कार्बोरेटर उपलब्ध नाही, मागवून देतो. कार्बोरेटर मिळाला पण अनेक दिवस झाले टाकी आलीच नाही. शेवटी तुम्ही भाड्याने मशीन घेतली आणि नांगरणी पूर्ण केली. बऱ्याच दिवसांनी पेट्रोल टाकी मिळाली आणि तुम्ही तुमच्या विडर ची दुरुस्ती करून घेतलीत. तुम्हाला ह्या सर्व प्रक्रियेमध्ये साधारण झालेला खर्च:

१. भाड्याचा खर्च : रु. २०००
२. कार्बोरेटर : रु. १५००
३. पेट्रोल टाकी : रु १५००
३. सर्व्हिसिंग : रु. १२००
४. साधारण वेळेचा खर्च (जो बऱ्याच वेळेला आपण मोजत नाही) : रु. २०००

एकूण खर्च : रु. ८२००

तेच बाजूच्या विक्रेत्याकडे रु २००० ने विडर महाग होता पण तो विक्रेता सर्व माहिती, सेर्व्हीसिंग आणि स्पेअर पार्ट उपलब्धता करून देता. रु. ६२००/-, वेळ आणि मेहनत सर्वच वाचले असते. 

त्यामुळे निव्वळ किमती कडे न बघता वरील तीन गोष्टी देखील नक्की तपासा. Viji ॲप द्वारे आम्ही तुम्हाला योग्य प्रॉडक्ट कमीत कमी किमतीत अधिकृत तसेच नामांकित विक्रेत्यांकडून खरेदी करायला मदत करू.