पॉवर विडर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर यातला फरक नेमका काय?

  • July 19, 2022
माझ्यासाठी यातले काय उपयोगी आहे? 

मुळात शेतामध्ये आपली माती सोबतची कामे सोपी करण्यासाठी माणसाने काही इंजिन चलित यंत्रे बनवली. मातीचे प्रकार, सपाट व डोंगराळ जमीन, चिखलाचे प्रमाण, एकूण क्षेत्रफळ ह्या सर्व बाबी बघता विविध डिझाईन तसेच ताकदीची यंत्रे बनवली गेली. सहसा ज्याची ताकद ९ एच पी पर्यंत आहे, आणि आकाराने छोटा तसेच हलका आहे त्याला आपण पॉवर विडर असे म्हणतो. तसेच १० ते १६ एच पी पर्यंत च्या यंत्रांना पॉवर टिलर असे म्हणतो. आणि १७ एच पी व अधिक ताकद असलेल्यांना आपण ट्रॅक्टर असे म्हणतो. मी नेमके ह्या तिघांपैकी काय घेतले पाहिजे?

त्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे:
१. माझे एकूण क्षेत्रफळ 
२. माझी पिके 
३. जमीन एकक्षेत्री कि मळे 
४. डोंगराळ की सपाट 
५. चिखलाचे प्रमाण 
६. झाडांमधील किंवा सरींमधील अंतर 
७. माझे बजेट 

अधिक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. शशिकांत राणे ह्यांची आंब्याची बाग आहे. जवळपास ७ एकर वरती आंब्याची लागवड केलेली आहे. ही लागवड डोंगराळ भागात आहे, आणि जमिनीचा उतार देखील कमी आहे. पण लागवड घन पद्धती ने केलेली असल्यामुळे दोन झाडांमधील अंतर कमी आहे. आणि त्या मुळे ट्रॅक्टर किंवा टिलर वापरणे सोयीचे होणार नाही, अश्या वेळेस आपण पॉवर विडर ची निवड केली पाहिजे. विडर डिझेल चा घ्यावा कि पेट्रोल त्या साठी हा ब्लॉग वाचू शकता : डिझेल विडर की पेट्रोल विडर? कोणता घ्यावा? 

ह्याच प्रमाणे आपल्या पीक, जमीन तसेच लागवडीच्या पद्धती प्रमाणे नीट अभ्यास झाला तरच तुमचा विडर, टीलर का ट्रॅक्टर हा निर्णय सोपा होऊ शकतो.