माझ्या जमिनीत चिखल जास्त आहे. कोणता विडर माझ्यासाठी योग्य असेल?

  • July 19, 2022
भात शेती मध्ये लावणी पूर्वी आपण चिखलणी करतो. प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थिती प्रमाणे जमिनीत कमी जास्त चिखल हा होत असतो. आपण तीन चिखलाच्या लेव्हल पाहूया आणि त्यासाठी कोणता विडर घेतला पाहिजे ते पाहूया. 

१. तळ पाय बुडेल इतका चिखल जर असेल तर छोटे पेट्रोल चे विडर तुम्ही घेऊ शकता. शक्यतो ५ एचपी ते ७ एचपी दरम्यान चे विडर तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. 

२. तळ पाय आणि गुडघ्याच्या मध्ये जर चिखल असेल तर तुम्ही डिझेल चा विडर किंवा मिनी टिलर घेतला पाहिजे. डिझेल चे विडर हे ५ एचपी ते ९ एचपी च्या दरम्याने येतात. आणि मिनी टिलर ८ ते ९ एचपी. डिझेल विडर मध्ये मागे रोटरी असलेले विडर देखील असतात. ते खरेदी करताना तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की रोटरी ची रचना ही जमिनीला लागून नसली पाहिजे, वरच्या दिशेने असली पाहिजे. 

पेट्रोल आणि डिझेल च्या विडर मधला फरक जाणून घ्यायचा आहे? हे वाचा डिझेल विडर की पेट्रोल विडर? कोणता घ्यावा?

३. गुडघ्यापर्यंत चिखल असेल तर तुमच्यासाठी पॉवर विडर योग्य राहणार नाही. अश्या स्थिती मध्ये तुम्ही पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर घेतला पाहिजे. तुमचे एकूण क्षेत्रफळ किती आहे आणि जमीन डोंगराळ भागात आहे की सपाट त्या आधारे तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. 

सर्व पॉवर विडर्स, पॉवर टिलर्स, ट्रॅक्टर्स तसेच इतर कृषी उपकरणांची माहीती घेण्यासाठी व्हिजी ॲप डाउनलोड करा. 

तसेच ही उपकरणे आपण योग्य विक्रेत्यांकडून खरेदी करत आहोत ना ह्या बद्दल आपण जागृक आहोत का? वाचा विक्रेत्याची निवड.