कोणकोणत्या प्रकारचे ग्रास कटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ?

  • August 6, 2022
ग्रास कटर / ब्रश कटर मुख्य तीन प्रकारचे येतात. साईडपॅक, बॅकपॅक आणि ट्रॉली टाईप ग्रास कटर. आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे कोणता ग्रास कटर आपल्यासाठी योग्य राहील हे तुम्ही ठरवू शकता. उपलब्ध असलेल्या साईडपॅक ग्रास कटर्स मध्ये इंजिन चलित, बॅटरी चलित तसेच इलेक्ट्रिक ग्रास कटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. 

१. साईडपॅक ग्रास कटर
आपले काम जलद वेगाने करायचे असेल तर साईडपॅक ग्रास कटर सर्वात उत्तम आहे. सर्व प्रकारच्या प्रोफेशनल कामांसाठी साईडपॅक ग्रास कटर वापरले जातात. हे ग्रास कटर तुलनेने वजनाने हलके असतात. साईडपॅक ग्रास कटर ला विविध प्रकारचे अटॅचमेंट लावता येतात ज्याने गवत कापणी व्यतिरिक्त इतर कामे देखील करता येतात. ग्रास कटर वापरून कोणकोणती कामे केली जाऊ शकतात हे पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : ग्रास कटर चे गवत कापणी सोडून इतर उपयोग काय?

साईडपॅक मध्येच इंजिन चलित, इलेक्ट्रिक व बॅटरी चलित ग्रास कटर येतात. इलेक्ट्रिक ग्रास कटर हे गार्डन किंवा घरगुती कामांसाठी वापरू शकता. बॅटरी चलित ग्रास कटर पर्यावरणाच्या दृष्टीने खूप उत्तम आहेत, त्याने प्रदूषण होत नाही. मात्र बॅटरी चलित ग्रास कटर खरेदी करण्यापूर्वी त्याची बॅटरी क्षमता आणि ती आपल्या कामासाठी पुरेशी आहे का हे तपासून घेणे. 

२. बॅकपॅक ग्रास कटर
बॅकपॅक ग्रास कटर म्हणजेच इंजिन आपण पाठीला बॅग लावतो तसे लावता येते. त्याने इंजिन चा भार पाठीवर येतो आणि त्यामुळे हे ग्रास कटर वापरायला सोपे असतात. नॉन प्रोफेशनल कामासाठी हे ग्रास कटर वापरले जातात. हे तुलनेने किमतीने जास्त असतात. ह्याना देखील विविध अटॅचमेंट्स लावून वापर करता येऊ शकतो. 

३. ट्रॉली टाईप ग्रास कटर
हे ग्रास कटर फारसे शेतकरी वापरताना दिसणार नाहीत कारण ह्याला जमीन ओबडधोबड असून चालत नाही. जमीन पूर्णपणे प्लेन असावी लागते. हे वापरण्यास खूप सोपे असतात, शारीरिक मेहनत फार लागत नाही. गार्डन मध्ये अश्या प्रकारचे ग्रास कटर वापरता येऊ शकतात. 


तिन्ही प्रकारामध्ये ग्रास कटर व्हिजी ॲप वरती खरेदी साठी उपलब्ध आहेत. ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पसंतीचा ग्रास कटर खरेदी करा.