ग्रास कटर हे एक बहुउद्देशीय उपकरण आहे. गवत कापणी व्यतिरिक्त असा देखील वापर करता येऊ शकतो :
१. भात / इतर पिकांची कापणी
ग्रास कटर ला ‘रिपर अटॅचमेंट’ व ४० दाती किंवा ८० दाती ब्लेड लावले की त्याचे रूपांतर कापणी यंत्रात होते. रिपर अटॅचमेंट अश्या प्रकारे दिसते.
पुढची बॉबीन / टॅप अँड गो काढून ही अटॅचमेंट ब्लेड सोबत बसवून आपण सहज पिकांच्या कापणी साठी वापरू शकता.
२. पिकांमधील तण काढणे
भात लावणी जर ओळींमध्ये केली असेल तर हे ‘पॅडी व्हील’ लावून आपण भातामधील तण काढू शकता. पुढची बॉबीन / टॅप अँड गो काढून ही अटॅचमेंट आपण बसवू शकता.
भाजीपाला पिकांमध्ये किंवा आपल्या फळ बागेमध्ये झाडाभोवती चे तण आपल्याला काढायचे असतील तर ‘विडर’ अटॅचमेंट आपले काम करेल.
३. किरकोळ नांगरणी
भाजीपाल्यासाठी आपल्याला किरकोळ नांगरणी करायची असेल तर आपण टिलर अटॅचमेंट ग्रास कटर ला लावून हे काम करू शकता. टिलर अटॅचमेंट अश्या प्रकारे दिसते.
४. भर देणे
भर देणे ही प्रक्रिया काही पिकांमध्ये महत्वाची असते. ‘डिचर’ अटॅचमेंट वापरून ग्रास कटर ने भर देखील देता येते.
५. फांद्या / अनावश्यक भाग कापणे
ग्रास कटर ला अनोखी फांद्या कापण्यासाठी ‘चेन सॉ’ अटॅचमेंट देखील लावता येते. ह्याने ग्रास कटर चा वापर पोल प्रुनर सारखा करता येतो.
ग्रास कटर मध्ये केलेली गुंतवणूकीचा तुम्ही त्याला इतर अटॅचमेंट लावून चांगला मोबदला मिळवू शकता. खरेदी करण्यापूर्वी आपल्या ग्रास कटर ला ह्या सर्व अटॅचमेंट बसतील ना ह्याची खात्री मात्र आपल्या विक्रेत्यांकडून करून घ्यावी.