ग्रास कटर चे गवत कापणी व्यतिरिक्त इतर ही उपयोग करता येतात. हा लेख वाचण्यापूर्वी त्याची माहिती तुम्हाला नसेल तर आधी पुढील ब्लॉग वाचून घ्यावा - ग्रास कटर चे गवत कापणी सोडून इतर उपयोग काय ? ग्रास कटर ला बसणारी विडर, टिलर किंवा डिचर अटॅचमेंट खरेदी करायची असेल तर पुढील ३ गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
१. रॉड चा प्रकार
२. पाईप चा व्यास
३. इंजिन ची ताकद
१. रॉड चा प्रकार
आपल्या ग्रास कटर च्या रॉड ची पुढील बाजू जी गेअर हेड ला अटॅच होते ती कोणत्या प्रकारची आहे हे पाहून घेणे - ७ दाती, ९ दाती का चौकोनी. ग्रास कटर ची गेअर हेड काढली की हे तुम्ही तपासू शकाल.
२. पाईप चा व्यास
आपल्या ग्रास कटर च्या पाईप ची व्यास २६ मिमी आहे, २८ मिमी आहे की इतर काही आहे हे मोजून घेणे.
३. इंजिन ची ताकद
इंजिन किती सीसी चे आहे ते तपासावे. ४ स्ट्रोक असेल तर ह्या अटॅचमेंट चा लोड घेण्यासाठी जास्त सीसी चे इंजिन असणे गरजेचे. तसेच २ स्ट्रोक असेल तर त्याच अटॅचमेंट ला तुलनेने कमी सीसी चे इंजिन देखील चालू शकेल.
विक्रेत्यांकडून ह्या अटॅचमेंट खरेदी करताना ह्या तीन बाबींची नोंद करून घ्यावी म्हणजे योग्य अटॅचमेंट तुम्ही खरेदी करू शकाल. तसेच आपल्या ग्रास कटर चे इंजिन देखील खराब होणार नाही.