आंबा, काजू च्या बागेत हा ट्रॅक्टर ठरू शकेल फायदेशीर

  • October 10, 2022
आंबा आणि काजू ही दोन कोकणातलीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख फळे आहेत. शेतकऱ्यांच्या एकूणच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तसेच काम सोपे होण्याच्या दृष्टीने VST MT270 हा ट्रॅक्टर आंबा आणि काजू पिकामध्ये कसा फायदेशीर ठरू शकतो ते पाहूया. 

आंब्याची कलमांची लागवड करताना १० x १० मीटर अंतरावर किंवा घन पद्धतीने लागवड करत असल्यास ५ x ५ मीटर अंतरावर खड्डे खोदावे लागतात. खड्डे साधारण १ x १ x १ मीटर आकाराचे खोदावे लागतात. तसेच काजू मध्ये ७ x ७ मीटर किंवा ८ x ८ मीटर अंतरावर 0.६ x 0.६ x 0.६ मीटर आकाराचे खड्डे लागतात. हे खड्डे खोदण्यासाठी ट्रॅक्टर ला अर्थ ऑगर ची अटॅचमेंट लावून वापरता येऊ शकते. VST MT 270 ने हे काम होऊ शकते. ट्रॅक्टर ला बसणाऱ्या ड्रिल बिट ची साईझ मोठी असते आणि त्यामुळे काम जलद होते. ट्रॅक्टर ला ड्रिल बिट लावून काम करताना VST ट्रॅक्टर चा व्हिडीओ पहा. आंब्याच्या मोहोरावरील तुडतुडे, मिजमाशी, फुलकिड अश्या किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच करपा किंवा फळकूज रोग सुद्धा होण्याची शक्यता असते. तसेच काजू मध्ये ढेकण्या ज्याला टी मॉस्किटो बग असे देखील म्हटले जाते किंवा करपा सारखे रोग होऊ शकतात. अश्यावेळेस जी फवारणी करावी लागते त्याला ट्रॅक्टर ऑपरेटेड एच टी पी स्प्रेअर नी फवारणी करता येऊ शकते. त्याचा फायदा म्हणजे ट्रॅक्टर आपण बागेमध्ये चालवत फवारणी करू शकतो. ट्रॅक्टर ला एचटीपी स्प्रेअर लावून फवारणी करतानाचा हा व्हिडीओ. तसेच मागे टँकर लावून झाडांना पाणी देखील घालता येऊ शकते. बागेमधील तण काढणे हे बागेची निगा राखण्यासाठी महत्त्वाचे असते. कारण तण असले की किडींना वाढायला वाव मिळतो. तसेच खतांमधील पोषण ह्या तणांनी शोषले तर पुरेसे पोषण झाडाला मिळत नाही. त्यामुळे तण व्यवस्थापना साठी VST MT270 ट्रॅक्टर चा रोटाव्हेटर किंवा इतर अटॅचमेंट लावून वापर करता येऊ शकतो. VST ट्रॅक्टर चा बागेमधील तण काढताना हा व्हिडीओ. आपल्या बागेमधील कोणत्याही प्रकारची वाहतूक करायला आपण ह्या ट्रॅक्टर ला ट्रॉली जोडू शकता. साधारण ३ टनापर्यंत त्याची हौलेज क्षमता आहे. बागेतील माती उपसणे किंवा भर घालणे, अशी कामे करण्यासाठी VST MT270 ह्या ट्रॅक्टर ला फ्रंट लोडर व बॅक हो ची अटॅचमेंट देखील लावता येते. MT270 सोबत ही अटॅचमेंट कशी काम करते त्यासाठी हा व्हिडीओ पहा. ह्या ट्रॅक्टर ला १ ते १.२५ लाख पर्यंत शासनाची सबसिडी देखील उपलब्ध आहे तसेच बँक लोन देखील करता येऊ शकते. ट्रॅक्टर खरेदी करताना आपल्या बागेची भौगोलिक स्थिती ट्रॅक्टर चालण्या सदृश्य आहे का याचा विचार नक्की करावा. 

व्हिजी ॲप द्वारे आपण VST ट्रॅक्टर खरेदी करू शकता. ह्याची किंमत प्राप्त करण्यासाठी खालील “Get Quotation” ह्या बटन वरती क्लिक करा. 

Related Products

VST MT270 Viraat Plus 4WD HT
Get quotation