पॉवर विडर चा असा देखील वापर होऊ शकतो हे तुम्हाला माहित होते का?

  • October 7, 2022
पॉवर विडर बऱ्याच वेळेला नांगरणी, चिखलणी किंवा तण काढायला वापरला जातो. पण त्याचा इतर शेतामधील कामांसाठी देखील वापर होऊ शकतो ज्याने नवीन उपकरण खरेदी करण्याचा खर्च वाचवता येऊ शकतो. १. सरी करणे / अळी करणे
भाजीपाल्यासाठी सरी करायच्या असतील किंवा कलमांभोवती अळी करायची असेल तर ह्या प्रकारची अटॅचमेंट तुम्ही लावू शकता. पॉवर विडर च्या मागच्या बाजूची नांगर पट्टी काढून तिथे ही अटॅचमेंट लावता येऊ शकते. पॉवर विडर वापरून अळी करताना डीस्कव्हर ॲग्रीकल्चर चा व्हिडीओ

२. भर देणे
उसामध्ये तसेच भाजीपाल्याच्या प्लॉट मध्ये भर द्यावयाची असेल तर डिचर अटॅचमेंट चा वापर तुम्ही करू शकता. यासाठी बॅक रोटरी असलेला विडर उपयोगाला येतो. बॅक रोटरी ला ही अटॅचमेंट जोडता येते. पुढे रोटरी असणाऱ्या विडर्स सोबत ही अटॅचमेंट वापरता येत नाही. डिचर अटॅचमेंट काम करताना चा व्हिडीओ

२. फवारणी
पॉवर विडर ला स्प्रेअर ची अटॅचमेंट लावून फवारणी साठी देखील वापर होऊ शकतो. ह्या ठिकाणी PTO शाफ्ट असणारे किंवा चेन बेल्ट दोन्ही प्रकारचे पॉवर विडर उपयोगाला येऊ शकतात. पॉवर विडर च्या इंजिन चा वापर इथे झाल्यामुळे फवारणी साठी वेगळे इंजिन खरेदी करावे लागत नाही, आणि तो खर्च इथे वाचतो. चेन बेल्ट पॉवर विडर ला स्प्रेअर ची अटॅचमेंट कशी जोडतात ते पहा. 

३. वॉटर पंप लावणे 
वॉटर पंप ची अटॅचमेंट लावून सिंचनाचे काम देखील होऊ शकते. वॉटर पंप लावण्यासाठी देखील PTO शाफ्ट असलेल्या पॉवर विडर ची आवश्यकता असते. पॉवर विडर ला वॉटर पंप कसा जोडावा त्याचा व्हिडीओ. 

४. पिकांची कापणी
रिपर अटॅचमेंट ने कापणी करणे देखील सहज शक्य होते. विडर ५ एचपी किंवा त्या पेक्षा अधिक ताकदीचा असावा, जेणेकरून काम उत्तम प्रकारे होईल. कापणी करण्यासाठी देखील विडर ला PTO शाफ्ट असणे आवश्यक आहे. रिपर अटॅचमेंट लावून कापणी करताना चा व्हिडीओ.  

व्हिजी ॲप वरती फ्रंट रोटरी, बॅक रोटरी, चेन बेल्ट, गियर ड्राइव्ह सर्व प्रकारचे पॉवर विडर खरेदी साठी उपलब्ध आहेत. आजच ॲप डाउनलोड करा.