चेन सॉ चा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जाऊ शकतो?

  • September 16, 2022
चेन सॉ ही एक कमालीची उपयुक्त मशीन आहे. चेन सॉ चा वापर झाडे तोडणे, ओंडके करणे, सरपण करणे, फांद्या किंवा अनावश्यक भाग कापणे तसेच गार्डनिंग साठी केला जाऊ शकतो. काही विशिष्ठ चेन सॉ चा वापर कॉंक्रिट कापण्यासाठी तसेच इतर बांधकाम संबंधी कामांसाठी केला जाऊ शकतो. 

१. झाडे तोडणे
चेन सॉ चा सर्वात प्रमुख उपयोग म्हणजे झाडे तोडणे. लहान झाडांपासून अगदी मोठ्या झाडांपर्यंत झाडे तोडण्यासाठी चेन सॉ चा वापर केला जाऊ शकतो. त्याप्रमाणे चेन सॉ च्या इंजिन ची पॉवर तसेच गाईड बार ची लांबी निवडावी लागते. झाडे तोडण्यासारख्या कामासाठी चेन सॉ वापरताना खूप काळजी घ्यावी लागते तसेच सेफटी किट घालूनच वापर करावा लागतो. 



२. ओंडके करणे
तोडलेल्या झाडापासून अनेक कामासाठी त्या लाकडाचा वापर केला जाऊ शकतो. कामाच्या स्वरूपाप्रमाणे योग्य आकाराचे ओंडके चेन सॉ वापरून तयार केले जाऊ शकतात. 

 

३. सरपण करणे
सरपण कापण्यासाठी जर तुम्ही कुऱ्हाडीचा वापर करत असाल तर त्याची आता काही आवश्यकता नाही. बॅटरी चलित किंवा इलेक्ट्रिक चलित चेन सॉ देखील वापरून तुम्ही सरपण तयार करू शकता. त्याने तुमचा पेट्रोल तसेच रिपेरिंग वर येणारा खर्च कमी होऊ शकतो. 



४. फांद्या / अनावश्यक भाग कापणे
आपल्या बागेमधील, घराजवळ किंवा रस्त्या लगत आलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी चेन सॉ चा वापर केला जाऊ शकतो. जर काम कमी वेळेचे असेल तर बॅटरी चलित चेन सॉ वापरता येऊ शकेल. अन्यथा पेट्रोल चलित चेन सॉ उपयुक्त ठरेल. 



५. गार्डनिंग
लाकडापासून कल्पक वस्तू चेन सॉ वापरून तयार केल्या जाऊ शकतात. गार्डन बेंच, बसण्यासाठी शेड, पाळीव प्राण्यांसाठी घर अश्या अनेक सर्जनशील गोष्टी तयार करता येतात. 

चेन सॉ व्हिजी ॲप वरती खरेदी साठी उपलब्ध आहेत. ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पसंतीचा चेन सॉ खरेदी करा.