चेन सॉ कोणती खरेदी करावी? विचारा स्वतःला हे ३ प्रश्न!

  • September 26, 2022
तुम्हाला चेन सॉ खरेदी करायची आहे पण नेमकी कोणती निवडावी हे कळत नाही आहे का? चेन सॉ चे इतके मॉडेल आणि इतक्या कंपनी झाल्या आहेत का हा गोंधळ होणे सहाजिक होते. योग्य चेन सॉ निवडण्यासाठी हे ३ प्रश्न स्वतःला विचारा 

१. चेन सॉ वापरण्यात मी किती अनुभवी आहे?
२. मी माझ्या चेन सॉ ने काय कट करू इच्छितो?
३. लाकडाचा व्यास किती आहे?

प्रत्येक प्रश्नावर सविस्तर जाणून घेऊया

चेन सॉ वापरण्यात तुमचा अनुभव कमी असेल किंवा पहिल्यांदाच चेन सॉ तुम्ही वापरणार आहात, तर तुम्ही एंट्री लेव्हल चेन सॉ पासून सुरवात करू शकता जसे की STIHL MS170, MS180 किंवा MS210. चेन सॉ ही एक पॉवरफुल मशीन आहे. जितकी पॉवर, तितकेच अपघात होण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळे चेन सॉ निवडताना आपल्या अनुभव पातळीची जाणीव ठेऊन निवड करावी. जसे तुम्हाला वापरण्यात आत्मविश्वास येईल, तसे तुम्ही अधिक क्षमतेचे चेन सॉ निवडू शकता. 



दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्या कामाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. जर वादळानंतर रस्त्यावरील किंवा रहिवासी भागातील झाडे क्लिअर करावयाची असतील, तर एंट्री लेव्हल चेन सॉ तुम्ही वापरू शकता. STIHL कंपनी चे MS170, MS180 किंवा MS210 चेन सॉ तुम्ही वापरू शकता. जर तुमचा वापर नियमित ओंडके कापण्यासाठी किंवा सरपण तयार करण्यासाठी होत असेल तर मिडीयम ड्युटी चेन सॉ जसे की STIHL MS230 किंवा MS250 तुम्ही वापरू शकता. जर तुमचा वापर रेग्युलर किंवा प्रोफेशनल कामासाठी असेल आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम होणे महत्वाचे असेल तर हेव्ही ड्युटी चेन सॉ तुम्ही खरेदी करू शकता. STIHL MS361, MS382 किंवा MS462 ह्या सारख्या चेन सॉ ची निवड तुम्ही करू शकता. 





तुम्हाला जे लाकूड कापायचे आहे त्याचा व्यास किती आहे? चेन सॉ च्या गाईड बार ची लांबी १४” पासून ५९” पर्यंत येते. ह्या विषयी स्पष्टता तुम्हाला असणे फार महत्वाचे आहे. 

ह्या ३ प्रश्नांसाठी तुमची उत्तरे काय आहेत? अभ्यास करा आणि योग्य निवड करा. 

STIHL कंपनी चे सर्व चेन सॉ व्हिजी ॲप वरती खरेदी साठी उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा. 

Related Products