STIHL चे दर्जेदार 3 ब्रश कटर - स्पेसिफिकेशन व किंमत

  • November 11, 2022
STIHL चे ग्रास कटर त्यांच्या क्वालिटी, जर्मन डिझाईन, आणि सर्वोत्तम परफॉर्मन्स साठी ओळखले जातात. अनेक वैशिष्ट्यांसह हे ग्रास कटर उपलब्ध आहेत. 

4 मिक्स इंजिन

STIHL चे 4-MIX® इंजिन, जे 2-स्ट्रोकप्रमाणे इंधन-तेल मिश्रणावर चालते, 4-स्ट्रोक पॉवरच्या तडजोडीशिवाय काम करते. STIHL 4-MIX® इंजिन तंत्रज्ञान अधिक ऍक्सलरेशन, उर्जा, टॉर्क, तुलनेने कमी आवाज, कमी उत्सर्जन आणि उत्तम इंधन कार्यक्षमता देते ज्याने काम जलद, शांतपणे आणि अधिक सहजपणे पूर्ण करता येते. 

अँटी-व्हायब्रेशन प्रणाली

ग्रास कटर च्या हँडलमध्ये तीव्र कंपनामुळे हात आणि बाहूंमधील रक्तवाहिन्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे STIHL ने एक प्रभावी अँटी-कंपन प्रणाली विकसित केली आहे ज्याद्वारे मशीनच्या इंजिनमधील कंपन कमी होते.

STIHL च्या हेवी ड्युटी ग्रास कटर ची रेंज 



FS230
FS 230 ब्रश कटरमध्ये 40.2cc, पेट्रोल इंजिन आहे. हा ब्रश कटर बजेटमध्ये पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स देतो. हा कृषी वापरासाठी उत्तम आहे. रीपर जोडणीसह, याचा वापर पीक कापणी साठी केला जाऊ शकतो. ह्याची किंमत ₹22,000/- ते ₹24,000/- पर्यंत आहे. 

FS120
FS 120 ब्रश कटरमध्ये 30.8cc, पेट्रोल इंजिन आहे. STIHL ब्रश कटरच्या मोठ्या श्रेणीमध्ये हे एक लोकप्रिय मशीन आहे. ह्यामध्ये STIHL 4 मिक्स इंजिन आहे. हा व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त आहे. ह्याची किंमत ₹28,000/- ते ₹30,000/- पर्यंत आहे.

FS250
FS 250 ब्रश कटरमध्ये 40.2cc, पेट्रोल इंजिन आहे. हा ब्रश कटर हेवी ड्युटी वापरासाठी योग्य आहे. यात STIHL 1-पॉइंट अँटी व्हायब्रेशन सिस्टीम सारखी वैशिष्ट्ये आहेत जी शरीरावरील इंजिन कंपनाचा प्रभाव कमी करते. STIHL इलॅस्टो स्टार्ट मशीन सुरु करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि सुलभ करते. ह्याची किंमत ₹38,000/- ते ₹40,000/- पर्यंत आहे.

FS230, FS120 आणि FS250 व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा. 

Related Products