भात कापणी जलद करण्यासाठी ३ उत्तम पर्याय

  • October 14, 2022

यांत्रिक पद्धतीने भात कापणी करताना वेळ वाचतो तसेच मजुरांवरील खर्च देखील कमी करता येतो. कापणी साठी ३ उत्तम पर्याय वापरले जाऊ शकतात. तुमचे बजेट, तसेच जमीनीत चिखल ह्यावरून कोणती पद्धत अवलंबवायची हे तुम्ही ठरवू शकता. 


१. पॉवर रिपर
पॉवर रिपर वापरून सर्वात जलद भात कापणी होऊ शकते. पॉवर रिपर साठी जमिन लेव्हल असणे तसेच जमिनीत चिखल नसणे आवश्यक आहे. हे मशीन छोट्या क्षेत्रात देखील फिरू शकते. रिपर मशीन ची कार्यक्षमता साधारण 0.5 ते 1 एकर प्रति तास इतकी असते, त्यावरून त्याच्या काम करण्याचा वेगाचा अंदाज आपल्याला येतच असेल. ही मशीन तुलनेने किमतीने जास्त असते. व्हीजी ॲप वरती व्हीएसटी, किसनक्राफ्ट, ग्रीव्ह्ज, श्राची ह्या कंपन्यांचे पॉवर रिपर खरेदी साठी उपलब्ध आहेत. 



२. पॉवर विडर ला रिपर अटॅचमेंट
पॉवर विडर ला देखील रिपर अटॅचमेंट लावायची सोय असते. ह्या साठी पॉवर विडर ५ एच पी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा असावा तसेच गेअर ड्राइव्ह पॉवर विडर असावा. ज्या शेतकऱ्यांकडे पॉवर विडर आहे ते ह्या पर्यायाचा विचार करू शकतात. ह्याने देखील काम जलद होऊ शकते आणि तुलनेने खर्च देखील अटॅचमेंट वरती कमी होतो. STIHL विडर ला रिपर अटॅचमेंट लावून कापणी करताना व्हिडीओ पहा. STIHL विडर खरेदी साठी व्हीजी ॲप डाउनलोड करा. 



३. ग्रास कटर ला रिपर अटॅचमेंट
ग्रास कटिंग माशीन ला देखील रिपर अटॅचमेंट लावता येते. ह्याने काम पूर्ण व्हायला वेळ आणि श्रम तुलनेने जास्त लागतात पण हे सर्वात किफायतशीर आहे. ग्रास कटर ची इंजिन क्षमता चांगली असावी ह्याची काळजी घेणे अन्यथा इंजिन वर जोर येऊ शकतो. ग्रास कटर ला रिपर अटॅचमेंट बसवताना तसेच वापरताना डिस्कव्हर ऍग्रीकल्चर चा हा व्हिडीओ. किसनक्राफ्ट, होंडा, STIHL इत्यादी ग्रास कटर व्हीजी ॲप वर उपलब्ध आहेत. 



सर्व प्रकारचे पॉवर रिपर, पॉवर विडर तसेच ग्रास कटर व्हीजी ॲप वर उपलब्ध आहेत. खरेदी साठी खालील प्रॉडक्ट्र्स वर “Get Quotation” वरती क्लिक करा. 

Related Products

SPR 126
Get quotation
KK-SPR-1201P
Get quotation
STIHL MH710
Get quotation
UMK435T U2NT
Get quotation
KK-BC-8640
Get quotation