पॉवर विडर चा सबसिडी अर्ज भरताना ह्या ३ चुका टाळा

  • September 30, 2022
पॉवर विडर हे एक अत्यंत उपयुक्त मशीन आहे ज्याचा वापर आपण नांगरणी, चिखलणी तसेच इतर शेतीच्या कामांसाठी देखील करू शकतो. छोट्या प्रमाणावर किंवा मळ्यांमध्ये शेती करणाऱ्यांसाठी पॉवर विडर हे मशीन एक वरदान ठरलेले आहे. 

पॉवर विडर वापरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ह्या मशीन खरेदी वरती अनुदान देखील दिलेले आहे. जर तुमचा शेतीचा सातबारा असेल, तर तुम्ही ह्या अनुदानाचा लाभ घेऊ शकता. 

अनेक वेळेला ह्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करताना काही चुका होतात ज्यामुळे सबसिडी मिळत नाही किंवा मिळायला उशीर होतो.

१. पॉवर विडर च्या ऐवजी ट्रॅक्टर किंवा टिलर चा अर्ज करणे 
अनेक वेळेला पॉवर विडर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर या मध्ये शेतकऱ्यांचा संभ्रम होतो. यातला नेमका फरक आपण आधी समजून घेऊया. सहसा ज्याची ताकद ९ एच पी पर्यंत आहे, आणि आकाराने छोटा तसेच हलका आहे त्याला आपण पॉवर विडर असे म्हणतो. तसेच ९ किंवा १० ते १६ एच पी पर्यंत च्या यंत्रांना पॉवर टिलर असे म्हणतो. आणि १७ एच पी व अधिक ताकद असलेल्यांना आपण ट्रॅक्टर असे म्हणतो. 

त्यामुळे अर्ज करताना आपण पॉवर विडर ची निवड करत आहोत ना ते तपासावे. 

२. इंजिन चलित पॉवर विडर ऐवजी मॅन्युअल विडर चा अर्ज करणे 
कम्पोनंट मध्ये तपशील निवडताना ‘मॅन्युअल’ आणि “ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे” असे दोन ऑप्शन असतात. त्या मध्ये “ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे” हे निवडावे तरच इंजिन चलित पॉवर विडर ह्याची निवड करता येते. 




३. पॉवर विडर एच पी मधील चुका
पॉवर विडर सबसिडी साठी ३ प्रकारचे कम्पोनंट असतात 
   अ) पॉवर विडर (२ बीएचपी पेक्षा कमी इंजिन ऑपरेटेड) 
   ब) पॉवर विडर (२ बीएचपी पेक्षा जास्त इंजिन ऑपरेटेड)
   क) पॉवर विडर (५ एचपी पेक्षा जास्त इंजिन ऑपरेटेड)

सर्व प्रथम आपल्याला किती एचपी चा पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्याचा निर्णय घेणे महत्वाचे आहे. आणि त्याप्रमाणे अर्ज करताना कम्पोनंट निवडावा. 

योग्य निवड करण्यासाठी आपल्याला २ एच पी पेक्षा कमी एच पी चा पॉवर विडर घ्यायचा आहे, २ ते ५ एच पी मध्ये घ्यायचा आहे की ५ एच पी पेक्षा जास्त ते पहिले पाहिजे. २ एच पी पेक्षा कमी चा पॉवर विडर घ्यावयाचा असेल तर (अ) कम्पोनंट ची निवड करावी, २ ते ५ एच पी मध्ये घ्यावयाचा असेल तर (ब) कम्पोनंट ची निवड करावी आणि ५ एच पी पेक्षा जास्त चा घ्यावयाचा असेल तर (क) कम्पोनंट ची निवड करावी. 



टीप: २ एचपी पेक्षा कमी एचपी च्या पॉवर विडर कम्पोनंट निवडीसाठी “एचपी श्रेणी निवडा” मध्ये “२० बीएचपी पेक्षा कमी” निवडावे, आणि २ एचपी पेक्षा जास्त एचपी च्या पॉवर विडर कम्पोनंट निवडीसाठी “एचपी श्रेणी निवडा” मध्ये “२० पेक्षा जास्त ते ३५ बीएचपी” निवडावे. 

वरील ३ गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर अर्जामध्ये चुका होणार नाहीत आणि तुमच्या वेळेचे तसेच पैशांचे नुकसान होणार नाही.