पॉवर स्प्रेअर ज्याला आपण एचटीपी स्प्रेअर देखील म्हणतो, तो विशेषतः फळ पिकांच्या बागेमध्ये फवारणी साठी वापरला जातो. ह्या स्प्रेअर खरेदी साठी शासनाने सबसिडी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
पाहूया पॉवर स्प्रेअर साठी अर्ज करताना कम्पोनंट कोणता निवडावा आणि प्राप्त होणारी सबसिडी रक्कम.
१. कम्पोनंट ची निवड
पॉवर स्प्रेअर सबसिडी साठी खालील कंपोनंट निवडावा
- पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर (१६ पेक्षा जास्त लि.) : (१.०० एचपी पेक्षा जास्त इंजिन)
महाडीबीटी पोर्टल वर खालील प्रमाणे कंपोनंट ची माहिती भरावी :
२. सबसिडी रक्कम
वरील तक्त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जीएसटी वगळून जी पॉवर स्प्रेअर ची रक्कम असेल त्याच्या ५०% किंवा ४०% सबसिडी प्राप्त होईल. मात्र कम्पोनंट प्रमाणे तसेच शेतकऱ्याची जमीन, महिला शेतकरी की पुरुष, आणि शेतकरी एस.सी. एस.टी आहे की इतर यावरून जास्तीत जास्त किती सबसिडी मिळू शकते याची मर्यादा ठरलेली आहे.
सर्व प्रकारचे पॉवर स्प्रेअर तसेच इतर कृषी उपकरणे कमीत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी व्हिजी ॲप डाउनलोड करा.