कोणत्या ही मशीन चे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच रिपेरिंग खर्च कमी करण्यासाठी त्याची देखभाल किंवा मेंटेनन्स करणे फार आवश्यक असते. रोज व्यायाम करणाऱ्या व पौष्ठिक खाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर कडे कमी जावे लागते, अगदी तसेच आहे.
मग आपल्या ग्रास कटर चा मेंटेनन्स कश्याप्रकारे करावा? प्रत्येक कंपनी प्रमाणे तसेच २ स्ट्रोक व ४ स्ट्रोक इंजिन प्रमाणे काही गोष्टी बदलतात, तरी आपण महत्वाच्या मेंटेनन्स टीप समजून घेऊया.
१. वापरण्यापूर्वी
वापरण्यापूर्वी पूर्ण मशीन तपासावी, कुठे लिकेज आहे का हे तपासावे, फ्युएल पंप तपासावा. ग्रास कटर ला लावलेली कटिंग अटॅचमेंट तसेच गार्ड तपासावे.
२. प्रत्येक वापरानंतर
ग्रास कटर वापरून झाल्यावर त्याची स्वच्छता करण्यापूर्वी इंजिन थंड होऊ द्यावे. जर ग्रास कटर ओला असेल, तर त्याला सुकू द्यावे. मग पूर्ण ग्रास कटर, एअर फिल्टर, बॉबीन / कटिंग अटॅचमेंट स्वछ करून घ्यावी. हे प्रत्येक वापरानंतर नक्की करावे.
जर तुमचा ग्रास कटर चा वापर एवढ्यात होणार नसेल तर त्यामधले इंधन काढून ठेवावे.
३. इंजिन ऑइल बदली (४ स्ट्रोक ग्रास कटर साठी)
नवीन ग्रास कटर घेतलेला असल्यास १० तास वापर किंवा पहिल्या महिन्यानंतर आणि ५० तास वापर किंवा सहा महिन्यानंतर इंजिन ऑइल बदलावे. कंपनी प्रमाणे ही वेळ बदलू शकते, त्यामुळे खरेदी करताना आपल्या विक्रेत्यांना ही माहिती विचारणे.
४. इंधन टाकीची स्वच्छता
ग्रास कटर ची पूर्ण इंधन टाकी ही वारंवार स्वच्छ करावी. आपल्या वापराप्रमाणे तसेच ग्रास कटर च्या प्रकाराप्रमाणे महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा ही टाकी टेक्निशियन कडून स्वच्छ करून घ्यावी.
५. ग्रीसिंग
ग्रास कटर च्या गेअर केस चे ग्रिसिंग करणे महत्वाचे असते. गेअर केस च्या इथला ग्रीस नट उघडून त्यामध्ये ग्रीस भरावे.
ह्या सर्व टीप्स आपण लक्षात ठेऊन केल्या तर आपल्या ग्रास कटर चे आयुष्य वाढायला मदत होईल तसेच रिपेरिंग वरचा खर्च देखील कमी होईल.
व्हिजी ॲप वरती तुम्ही २ स्ट्रोक, ४ स्ट्रोक तसेच इंजिन, बॅटरी व इलेक्ट्रिक ऑपरेटेड ग्रास कटर खरेदी करू शकता.