ड्रोन आणेल का कृषी क्षेत्रात क्रांती?

  • October 19, 2022
जागतिक बँके नुसार, भारत हा डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि तांदूळ, गहू, कापूस, ऊस, फळे, भाज्या आणि चहाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. 

अश्या ह्या आपल्या कृषी प्रधान देशात, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, कीटकनाशके आणि खते फवारण्यासाठी आणि टोळांच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. कामाच्या स्वरूपानुसार, ड्रोन, फवारणी यंत्रणेसह किंवा पिकांच्या मॅपिंगसाठी सेन्सरसह माउंट केला जाऊ शकतो. ड्रोनचा आकार आणि कॉन्फिगरेशनवर आधारित, कृषी ड्रोनची किंमत 1 लाख ते 10 लाख रुपया पर्यंत जाते. 

शेतामध्ये ड्रोन वापरून फवारणी करताना एका तरुण शेतकऱ्याची एबीपी माझा ने घेतलेली मुलाखत. व्हिडीओ पहा



ड्रोन ची कोणत्या पिकावर किती परिणामकारकता मिळते ह्याचा अभ्यास महत्वाचा आहे. मात्र स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि मार्केट रिसर्च फर्म BlueWeave Consulting द्वारे केलेल्या अलीकडील अभ्यासात, 2022 - 2028 या कालावधीत 25% पेक्षा जास्त अंदाजित वार्षिक वाढीसह, 2028 पर्यंत भारतीय कृषी ड्रोन मार्केट चार पटीने वाढेल असा अंदाज आहे. 



फवारणी, सेन्सिंग/इमेजिंग, पेरणी/लावणी याच्यामध्ये फवारणी साठी चा वापर हा ५० टक्क्यांहून अधिक असेल असा अंदाज आहे. 

सेन्सिंग आणि इमेजिंगमुळे उत्पादकता आणि पीक उत्पादनात वाढ होण्याचे परिणाम दिसून आले आहेत, विशेषत: स्पेशालिटी पिके आणि फळांच्या बागेत. सेन्सिंग आणि इमेजिंग ड्रोन वापरून कसे करतात त्याचा हा व्हिडीओ. मोठे उद्योग आणि कमर्शियल शेती करणारे, भारतातील इतर शेतकर्‍यांपेक्षा लवकर याचा वापर करायला सुरवात करतील. 

शेतीमध्ये ड्रोन वापराच्या काही समस्या आहेत. बहुतेक ड्रोनची उड्डाणाची वेळ 20 मिनिटे ते 1 तासाच्या दरम्यान असते. एका चार्ज मध्ये किती क्षेत्र कव्हर करू शकते ह्यामध्ये मर्यादा येते. ड्रोन जे जास्त उड्डाण वेळ आणि जास्त रेंज देऊ शकतात ते तुलनेने महाग आहेत.

ड्रोन वापरावर हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. जर बाहेर खूप वारा असेल किंवा बाहेर पाऊस पडत असेल तर ड्रोन वापरणे कठीण होते. 

नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना समस्या येणे सहाजिक आहे. पुढील काळात हे तंत्रज्ञान अधिक विकसित होऊन ड्रोन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवतील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

कृषी उपकरणांची कमीत कमी किमतीत खरेदी, नवीन तंत्रज्ञान, प्रॉडक्ट्स आणि सबसिडी विषयक माहिती साठी आजच व्हीजी ॲप डाउनलोड करा.