चेन सॉ, ज्याला स्थानिक भाषेत वुड कटर असे देखील म्हटले जाते, ते मुख्यतः तीन प्रकारामध्ये येते. पेट्रोल चलित, बॅटरी चलित तसेच इलेक्ट्रिक चेन सॉ. बॅटरी चलित मध्ये मिनी चेन सॉ देखील उपलब्ध होतो. आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे कोणता चेन सॉ आपल्यासाठी योग्य राहील हे तुम्ही ठरवू शकता.
१. पेट्रोल चलित चेन सॉ
ह्या प्रकारचा चेनसॉ इतर कोणत्याही चेन सॉ पेक्षा लाकूड वेगाने कापतो. हे चेन सॉ हेवी ड्युटी असल्यामुळे मोठी झाडे कापणे सहज शक्य होते मात्र ह्यामधून व्हायब्रेशन आणि आवाज देखील जास्त येते. ह्यांना मेंटेनन्स कायम करणे आणि सर्व्हिसिंग वेळेत होणे गरजेचे असते जेणेकरून काम चांगले होईल. ह्या मध्ये बहुतेक वेळेस २ स्ट्रोक इंजिन असते.
२. बॅटरी चलित चेन सॉ
छाटणी आणि लहान झाडे तोडणे यासारख्या "हलक्या" कामांसाठी बॅटरीवर चालणारे चेन सॉ तयार केले जातात. कॉर्डेड इलेक्ट्रिक चेन सॉ एवढी शक्ती यामध्ये नसते. हे चेन सॉ सोप्या कामांसाठी उत्तम पर्याय आहे कारण त्यांना जास्त वेळ लागत नाही. ह्यामध्ये बॅटरी आगाऊ चार्ज कराव्या लागतात. बॅटरी डिस्चार्ज झाल्यास एका वेळेस अधिक काम करण्यात मर्यादा येतात. अश्या वेळेस अतिरिक्त बॅटरी सोबत ठेवल्यास जास्त वेळ काम करता येऊ शकते.
मिनी चेन सॉ
छोट्या फांद्या कापण्यासाठी अश्या प्रकारच्या बॅटरी चलित चेन सॉ चा वापर केला जाऊ शकतो.
३. इलेक्ट्रिक चेन सॉ
इलेक्ट्रिक चेन सॉ विजेवर चालतात आणि त्यात प्लग-इन पॉवर कॉर्ड असते. इलेक्ट्रिक चेन सॉ कॉर्ड च्या लांबी एवढेच दूर जाऊ शकतात कारण ते वापरले जात असताना प्लग इन करणे आवश्यक आहे. झाडे तोडण्यासारख्या कठीण कामांसाठी ह्या चेन सॉ चा वापर केला जाऊ शकत नाही. घरा जवळचे काम करण्यासाठी हा चॅन सॉ वापरू शकता. बॅटरी किंवा पेट्रोल चलित चेन सॉ पेक्षा हे किमतीने तुलनेने कमी असतात.
तिन्ही प्रकारामध्ये चेन सॉ व्हिजी ॲप वरती खरेदी साठी उपलब्ध आहेत. ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पसंतीचा चेन सॉ खरेदी करा.