आपल्या चेन सॉ चे मेंटेनन्स आपण करता का?

  • September 19, 2022
कोणत्या ही मशीन चे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच रिपेरिंग खर्च कमी करण्यासाठी त्याची देखभाल किंवा मेंटेनन्स करणे फार आवश्यक असते. रोज व्यायाम करणाऱ्या व पौष्ठिक खाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर कडे कमी जावे लागते, अगदी तसेच आहे.

मग आपल्या चेन सॉ चा मेंटेनन्स कश्याप्रकारे करावा? कंपनी प्रमाणे काही गोष्टी बदलतात, तरी आपण पेट्रोल चलित चेन सॉ साठी महत्वाच्या मेंटेनन्स टीप समजून घेऊया. 

१. वापरण्यापूर्वी
वापरण्यापूर्वी पूर्ण मशीन तपासावी, कुठे लिकेज आहे का हे तपासावे, फ्युएल पंप तपासावा. चेन ब्रेक काम करतो आहे का ते पाहावे. तसेच चेन ची धार, चेन चे टेन्शन व गाईड बार तपासावे. सर्व बटन तसेच लिव्हर, चोक इत्यादी तपासावे. 

२. प्रत्येक वापरानंतर 
चेन सॉ वापरून झाल्यावर त्याची स्वच्छता करण्यापूर्वी इंजिन थंड होऊ द्यावे. जर चेन सॉ ओली असेल, तर आधी सुकू द्यावे. प्रत्येक वापरानंतर पूर्ण चेन सॉ व्यवस्तीत स्वच्छ करून घ्यावी. 

३. टॅंक मध्ये इंधन भरल्यावर 
टॅंक मध्ये इंधन भरल्यावर त्या सर्व गोष्टी कराव्या ज्या चेन सॉ वापरण्यापूर्वी कारावयाच्या आहेत. 

४. इंधन टाकीची स्वच्छता
चेन सॉ ची पूर्ण इंधन टाकी ही वारंवार स्वच्छ करावी. सरासरी महिन्यातून एकदा इंधन टाकीची स्वच्छता करावी. त्याच सोबत फ्युएल फिल्टर, फ्युएल पाईप देखील तपासावे. फ्युएल फिल्टर असेम्ब्ली वर्षातून एकदा टेक्निशियन कडून बदलून घ्यावी. 

५. ल्युब्रिकेशन 
गाईड बार आणि चेन यांच्यातील घर्षण टाळण्यासाठी आपल्या चेन सॉ ला ऑइलिंग करणे आवश्यक आहे. पुरेसे ऑइलिंग झाले नसल्यास, चेन पाहिजे तितक्या वेगाने चालणार नाही आणि मशीन गरम होऊ शकते. त्यामुळे चेन ल्युब्रिकेशन ची काळजी वापरताना घेणे आवश्यक आहे. 

ह्या सर्व टीप्स आपण लक्षात ठेऊन केल्या तर आपल्या चेन सॉ चे आयुष्य वाढायला मदत होईल तसेच रिपेरिंग वरचा खर्च देखील कमी होईल. 

व्हिजी ॲप वरती तुम्ही पेट्रोल चलित, बॅटरी चलित तसेच इलेक्ट्रिक चलित चेन सॉ खरेदी करू शकता. आजच व्हिजी ॲप डाउनलोड करा.