पावसाळा जवळ आला की बऱ्याच कोकणातल्या शेतकऱ्यांना पडणारा हा प्रश्न.
प्रश्नाचे निरसन करण्यासाठी आधी बाजूच्याने कोणता विडर घेतला आहे हे बघून मी पण तोच घेतो अश्या प्रकारे खरेदी करणारा काही शेतकरी वर्ग आहे. किंवा "तो नाक्यावरचा दुकानदार माझ्या ओळखीचा आहे, त्यालाच विचारतो. तो सांगेल ते मी घेईन", अश्या प्रकारे निर्णय घेणारा पण शेतकरी गट आहे.
पण मी माझी गरज नेमकी समजून त्या प्रमाणे निर्णय घेतो आहे का? माझे एकूण क्षेत्रफळ किती, जमिनीत चिखल किती, जमीन डोंगराळ भागात आहे कि सपाट, कोणकोणत्या पिकांसाठी मला विडर लागणार आहे, नांगरणी चिखलणी सोबत फवारणी, भात कापणी ही कामे देखील मला करावी लागणार आहेत का, सबसिडी मध्ये उपलब्ध कोणते विडर आहेत. अश्या अनेक प्रश्नांची योग्य उत्तर मी माझ्यासाठी शोधली, तर कोणता पॉवर विडर घेऊ याचे उत्तर अगदीच सोपे होऊन जाते..
म्हणूनच शेतकऱ्यांना योग्य प्रॉडक्ट घेण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी, आणि त्यांना ते प्रॉडक्ट अधिकृत विक्रेत्यांकडून कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी Viji हे ॲप तयार केले आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा..