ब्रश कटर महाडीबीटी सबसिडी बद्दल महत्वाची माहिती

  • September 3, 2022
ब्रश कटर / ग्रास कटर सबसिडी साठी अर्ज भरत आहात ? मग ही माहिती तुमच्या निश्चितच उपयोगी येईल. 

१. कम्पोनंट ची निवड
२. सबसिडी रक्कम

१. कम्पोनंट ची निवड
 
ब्रश कटर सबसिडी साठी २ प्रकारचे कम्पोनंट असतात 
अ) ब्रश कटर ( इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ३ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर २० बीएचपी पेक्षा कमी ) 
ब) ब्रश कटर ( इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ३- ५ बीएचपी पेक्षा कमी / टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा कमी )

योग्य निवड करण्यासाठी आपल्याला ३ एच पी पेक्षा कमी एच पी चा ब्रश कटर घ्यायचा आहे की जास्त ते पहिले पाहिजे. ३ एच पी पेक्षा कमी चा ब्रश कटर घ्यावयाचा असेल तर (अ) कम्पोनंट ची निवड करावी. आणि जास्त चा घ्यावयाचा असेल तर (ब) कम्पोनंट ची निवड करावी. 


टीप: ३ एचपी पेक्षा जास्त एचपी च्या ब्रश कटर कम्पोनंट निवडीसाठी “एचपी श्रेणी निवडा” मध्ये २० बीएचपी पेक्षा जास्त ते ३५ बीएचपी हा प्रकार निवडावा. 

२. सबसिडी रक्कम

वरील तक्त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जीएसटी वगळून जी ब्रश कटर ची रक्कम असेल त्याच्या ५०% किंवा ४०% सबसिडी प्राप्त होईल. मात्र कम्पोनंट प्रमाणे जास्तीत जास्त किती सबसिडी शेतकर्याला मिळू शकते याची मर्यादा ठरलेली आहे. 

सर्व प्रकारचे ब्रश कटर तसेच इतर कृषी उपकरणे कमीत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी व्हिजी ॲप डाउनलोड करा. 

Related Products

KK-BC-8640
Get quotation
UMK435T U2NT
Get quotation
UMK450T U2NT
Get quotation