हे बॅटरी चलित चेन सॉ वाचवतील इंधनावरील खर्च

  • September 28, 2022
सर्व जग सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. आणि तशीच क्रांती कृषी उपकरणांमध्ये देखील येणार आहे. त्याची महत्वाची कारणे म्हणजे, वाचणारा इंधनावरील खर्च आणि प्रदूषण विरहीत काम. STIHL कंपनी चे काही बॅटरी ऑपरेटेड चेन सॉ आहेत, त्याचे स्पेसिफिकेशन व किंमत आपण जाणून घेऊया. १. MSA140
MSA140 ही 36V च्या रेटेड व्होल्टेजसह लाइटवेट बॅटरी-ऑपरेट चेन सॉ आहे. यात सॉफ्ट हँडल आणि जलद आणि सोयीस्कर चेन बदलण्याची प्रक्रिया आहे. हे STIHL द्वारे ऑफर केलेल्या वेगवेगळ्या बॅटरीसह खरेदी केले जाऊ शकते. सर्वात शक्तिशाली बॅटरी 40 मिनिटांपर्यंत अंदाजे चालू शकते. हे 14” गाईड बार सह येते आणि ह्याचे वजन 2.7 किलो आहे. 

किंमत: ₹33,000/- ते ₹38,000/- (Sep 2022)

२. MSA160
MSA 160 ही बॅटरीवर चालणारी चेन सॉ आहे आणि आवाज संवेदनशील भागात वापरण्यासाठी योग्य आहे. यासाठी कानाच्या संरक्षणाची गरज नाही. ह्याची बॅटरी साधारण 35 मिनिटांपर्यंत चालू शकते. हे 14” गाईड बार सह येते आणि ह्याचे वजन 2.7 किलो आहे. 

किंमत: ₹48,000/- ते ₹53,000/- (Sep 2022)

३. MSA200
MSA 200 ही बॅटरीवर चालणारी चेन सॉ आहे. यात MSA160 चेन सॉ पेक्षा जास्त टॉर्क आणि कटिंग क्षमता आहे. ह्याची बॅटरी साधारण 45 मिनिटांपर्यंत चालू शकते. हे 14” गाईड बार सह येते आणि ह्याचे वजन 3.3 किलो आहे. 

किंमत: ₹50,000/- ते ₹56,000/- (Sep 2022)

MSA140, MSA160 आणि MSA200 व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा.

Related Products

MSA 140
Get quotation
MSA 160
Get quotation
MSA 200
Get quotation