व्हीएसटी शक्ती चा ९ एचपी मिनी पॉवर टिलर करेल दमदार काम

  • August 8, 2022
पॉवर टिलर घ्यायचा आहे पण तुमचे बजेट कमी आहे का? तर हा पर्याय तुमच्यासाठी अगदी योग्य ठरू शकेल. व्हीएसटी शक्ती कंपनी ने ९ एचपी डिझेल मध्ये ९५ डी आय इग्निटो हा नाविन्यपूर्ण पॉवर टिलर लाँच केला आहे. 

इग्निटो ची वैशिष्ठ्ये:
१. सेल्फ स्टार्ट सुविधा
बरेच पॉवर टिलर सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना रीकॉइल ओढावी लागते. ह्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी कंपनी ने सेल्फ स्टार्ट ची सुविधा दिली आहे. शारीरिक त्रास आणि रीकॉइल मधून येणाऱ्या प्रॉब्लेम पासून सुटका होऊ शकते. 

२. दोन रोटरी प्रकारामध्ये उपलब्ध 
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कंपनी ने ह्या पॉवर टिलर ला दोन प्रकारची रोटरी दिली आहे, ३४० मिमी आणि ५४० मिमी ची. आपल्या पिकामधील अंतराप्रमाणे आपण रोटरी चा प्रकार निवडू शकता. 

३. सुलभ टर्निंग
शेतातील कोपऱ्यांमध्ये देखील उत्तम काम ह्या पॉवर टिलर ने करता येणे शक्य आहे. 

इग्निटो चे तपशील:

इग्निटो चे उपयोग:
इग्निटो नांगरणी, चिखलणी, फवारणी, तण काढणे, फळ झाडांभोवती अळी किंवा बँड करणे, भर देणे, सरी करणे अश्या विविध कामांसाठी योग्य अटॅचमेंट लावून वापर करू शकता. 

अधिक माहिती साठी आणि खरेदी साठी वापरा व्हिजी ॲप.