महाडीबीटी सबसिडी साठी ऑनलाईन अर्ज च्या ३ मुख्य पायऱ्या

  • August 26, 2022
अनेक वेळा शेतकरी कोणामार्फत तरी हा ऑनलाईन सबसिडी अर्ज करत असतात, सायबर कॅफे, ई-सुविधा केंद्र किंवा विक्रेते. मग आपली प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी ह्या ३ मुख्य पायऱ्या लक्षात ठेवल्या पाहिजे.

१. नवीन अर्ज
२. डॉक्युमेंट्स अपलोड
३. इन्व्हॉईस / बिल अपलोड

प्रत्येक पायरी सविस्तर जाणून घेऊया.. 

१. नवीन अर्ज
तुम्हाला नवीन ट्रॅक्टर किंवा इतर उपकरणे सबसिडी अंतर्गत खरेदी करायची असतील, तर सर्वप्रथम नवीन अर्ज करावा लागेल. जर तुम्ही हा अर्ज पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/ ह्या वेबसाईट वर नवीन अकाउंट काढण्यासाठी खालील कागदपत्रे असणे गरजेची आहेत:

  • सातबारा
  • ८अ
  • आधार कार्ड
  • पॅन नंबर (असल्यास)
  • बँक अकाउंट
  • आधार सोबत लिंक मोबाईल नंबर 
  • कास्ट सर्टिफिकेट (असल्यास)
  • अपंगत्व असल्यास अक्षमता प्रमाणपत्र (डिसऍबिलिटी सर्टिफिकेट) 

तुमचे अकाउंट तयार झाले की अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या उपकरणासाठी अर्ज करायचा आहे त्याचे तपशील देखील द्यावे लागेल. 

उदा. मला 27HP, 4 व्हील ड्राइव्ह ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे. किंवा मला 5HP चा पॉवर विडर खरेदी करायचा आहे. 

इथे अनेक शेतकऱ्यांची अशी चूक होते की ते यंत्राचे तपशील नीट सांगत नाही आणि मग अर्ज करताना चूक होते. त्यामुळे खरेदी करायचे असते एक आणि दुसऱ्याच यंत्राची सबसिडी मंजूर होते. त्याने वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातात. 

पूर्ण प्रक्रियेतील ही सर्वात महत्वाची पायरी आहे ज्याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. 

महत्वाची टीप: अर्ज बाहेरून केला असला तरी आपला आयडी पासवर्ड स्वतःकडे लिहून ठेवावा.  

२. डॉक्युमेंट्स अपलोड
तुम्हाला सबसिडी मंजूर झाली की शासनाकडून एक मेसेज येईल. तसेच संबंधित कृषी अधिकारी देखील संपर्क करू शकतील. आता तुम्हाला खरेदी करावयची वस्तू निवडायची आहे, त्या वस्तूचा शासन मान्य टेस्ट रिपोर्ट आहे का हे पाहायचे आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी द्यायचे आहे. खालील गोष्टी डॉक्युमेंट अपलोड च्या वेळेस महत्वाच्या आहेत:

  • यंत्राचे कोटेशन
  • टेस्ट रिपोर्ट
  • विक्रेत्याचे डिलरशील सर्टिफिकेट
  • आधार कार्ड
  • सातबारा (६ महिन्या मधली प्रत)
  • ८अ (६ महिन्या मधली प्रत)
  • बँक पासबुक चा फोटो
  • कास्ट सर्टिफिकेट (असल्यास)
  • अपंगत्व असल्यास अक्षमता प्रमाणपत्र (डिसऍबिलिटी सर्टिफिकेट) 

डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यावरती कृषी विभागाकडून त्याची तपासणी होते आणि काही त्रुटी असतील तर संबंधित डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करावे लागतील. जर त्रुटी नसतील तर तुम्हाला यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती पत्र येईल. 

यंत्राची खरेदी झाल्यावर पुढील पायरी महत्वाची:

३. इन्व्हॉईस / बिल अपलोड
खरेदी करून झाल्यावर विक्रेत्याकडून खरेदीचे जीएसटी बिल, पैसे दिल्याची पावती तसेच डिलिव्हरी चलन घ्यावे. आणि ही तिनही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी द्यावी. ह्या मध्ये देखील काही त्रुटी असतील तर त्याची पूर्तता करावी. 

ऑनलाईन प्रक्रियेतील ह्या ३ मुख्य पायऱ्या आहेत. पुढील कार्यवाही जसे की यंत्र खरेदी केल्याची तपासणी व सबसिडी रक्कम जमा करणे ही कृषी विभाकडून केली जाईल. 

Viji ॲप तुम्हाला योग्य कृषी उपकरणे निवडण्यात तसेच अधिकृत विक्रेत्यांमार्फत कमीत कमी किमतीत खरेदी करायला मदत करेल. आजच ॲप डाउनलोड करा.